महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडात 5 तोळे सोन्याची चोरी; आरोपी 72 तासांत जेरबंद - 50 gram gold robbery latest news

चौक गावच्या हद्दित 14 डिसेंबरला नवरत्न हॉटल जवळ सायंकाळी 7. 30 च्या दरम्यान फिर्यादि पान टापरी वर नेहमीप्रमाणे तंबाखू खान्यासाठी गेला होता. त्याला एका अज्ञात आरोपीने बोलाऊन हॉटेलच्या मागे नेले. तेथे अंधारात दबा घरुन बसलेल्या त्याच्या साथीदारांनी फिर्यादीवर हल्ला केला. चाकूचा धाक दाखवत त्याला मारहाण केली.

khalapur police station raigad
खालापूर पोलीस ठाणे, रायगड

By

Published : Dec 20, 2019, 5:18 PM IST

रायगड - एका व्यक्तिस 14 डिसेंबरला अंधाराचा फायदा घेत चोरांनी चाकूचा धाक दाखवत 52 ग्रामची सोन्याची चैन चोरी केली केली होती. तसेच चोर कानातील बाली आणि मोबाइल घेऊन पळून गेले होते. खालापूर तालुक्यात चौक गावच्या हद्दित ही घटना घडली होती. मात्र, यानंतर खालापूर पोलिसांनी 72 तासांच्या आता चोरांना मुद्देमालासह जेरबंद केले.

आरोपींना 72 तासानंतर जेरबंद करण्यात आले.

चौक गावच्या हद्दीत 14 डिसेंबरला नवरत्न हॉटेलजवळ सायंकाळी 7. 30 च्या दरम्यान फिर्यादी पान टापरीवर नेहमीप्रमाणे तंबाखू खान्यासाठी गेला होता. त्याला एका अज्ञात आरोपीने बोलावून हॉटेलच्या मागे नेले. तेथे अंधारात दबा घरुन बसलेल्या त्याच्या साथीदारांनी फिर्यादीवर हल्ला केला. चाकूचा धाक दाखवत त्याला मारहाण केली. यानंतर त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन, कानातील बाली आणि मोबाइल घेऊन ते पसार झाले.

हेही वाचा -औरंगाबादच्या निराला बाजारातील हुक्का पार्लरवर छापा; 14 जण अटकेत

यानंतर फिर्यादीने खालापूर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बांगर यांनी घटनेचा तपास तत्काळ सुरु केला. यानंतर अवघ्या 72 तासांत पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details