महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 39वर, पनवेलमधील 10 पॉझिटिव्ह झाले निगेटिव्ह - रायगड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 39 वर

श्रीवर्धनमध्ये 2 दिवसांपूर्वी मुंबईतून आलेला भोस्ते गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. आज अजून 4 कोरोना बाधितांची भर पडली असून, श्रीवर्धन मधील कोरोनाबाधितांची संख्या पाचवर पोहोचली आहे. आनंदाची बाब म्हणजे पनवेल येथे कोरोना पॉझिटिव्ह उपचार घेत असलेल्या 10 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत.

Breaking News

By

Published : Apr 19, 2020, 8:39 PM IST

रायगड - श्रीवर्धनमध्ये 2 दिवसांपूर्वी मुंबईतून आलेला भोस्ते गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. आज अजून 4 कोरोनाबाधितांची भर पडली असून, श्रीवर्धन मधील कोरोनाबाधितांची संख्या पाचवर पोहोचली आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुका हा आता डेंजर झोनमध्ये आला आहे. तर पनवेल येथील विचुंबे गावातील एका व्यक्तीचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

रायगड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 39 वर

आनंदाची बाब म्हणजे पनवेल येथे कोरोना पॉझिटिव्ह उपचार घेत असलेल्या 10 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीत एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 39 झाली आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात मुंबई येथून आलेला व्यक्ती हा पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 28 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. यामध्ये त्याची पत्नी आणि तीन मुले यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर 24 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. चार पॉझिटिव्ह बाधितांवर पनवेल कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पनवेल तालुक्यातील विचूबे गावातील एका व्यक्तीचा रिपोर्ट हा आज कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती बीपीटी येथे कामाला असून परराज्यातून आलेला होता. त्यामुळे कामावरून येता जाता प्रवासात बाधा झाली असेल. आनंदाची बातमी म्हणजे पॉझिटिव्ह असलेल्या 10 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. त्याचे नमुने परत घेतले असून, ते निगेटिव्ह आल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांना सोडले जाणार असल्याची माहिती उपयुक्त दत्तात्रेय नवले यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details