महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने विदेशी पर्यटकांनी चोरली 35 हजारांची रक्कम

जांभरे यांनी दुकानात लावलेले सीसीटीव्ही तपासले असता दुकानात आलेले विदेशी पर्यटक हे पैसे चोरताना दिसले. ही बाब लक्षात येताच सीसीटीव्ही फुटेज घेऊन जांभरे यांनी गोरेगाव पोलीस ठाणे गाठले. पोलीसांनी त्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला.

35-thousand-stolen-by-foreign-tourists-in-raigad
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने विदेशी पर्यटकांनी चोरली 35 हजारांची रक्कम

By

Published : Dec 16, 2019, 8:31 PM IST

रायगड-रायगड जिल्ह्याची पर्यटकांना भुरळ पडली असून राज्यातील, देशातील तसेच विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रेपोली येथील व्यापाऱ्याला 35 हजाराचा गंडा विदेशी पर्यटकांनी घाटला आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

येणारा पर्यटक अथवा वाटसरू हा अतिथी असल्याने आपण त्याची मदत करतो. रायगड हा पर्यटन जिल्हा असल्याने विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात पर्यटनास येत असतात. असेच दोन पर्यटक हे रविवारी दुपारी माणगाव तालुक्यातील रेपोली येथील भात खरेदी विक्री करणारे व्यापारी वासुदेव जांभरे यांच्या दुकानात आले होते. जांभरे यांचे मुंबई गोवा महामार्गावर दुकान आहे. ते जांभरे यांच्या दुकानात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आले. त्यानंतर दोन हजार रुपयांचे सुट्टे पैसे मागितले. जांभरे यांनी सुट्टे पैसे दिले. त्यावेळी एकाने जांभरे यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. याचा फायदा घेऊन दुसऱ्या पर्यटकाने त्यांच्या गल्यातील 35 हजार रोकडवर डल्ला मारून ते पसार झाले. त्यामुळे विदेशी पाहुण्याच्या या हातचलखीने आता अतिथी देवो भव संस्कृती जतन करताना फसले जाणार नाही याची दक्षता घेणे महत्वाचे ठरले आहे.

जांभरे यांनी दुकानात लावलेले सीसीटीव्ही तपासले असता दुकानात आलेले विदेशी पर्यटक हे पैसे चोरताना दिसले. ही बाब लक्षात येताच सीसीटीव्ही फुटेज घेऊन जांभरे यांनी गोरेगाव पोलीस ठाणे गाठले. पोलीसांनी त्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला. गोरेगाव पोलीस या चोरट्यांचा तपास करीत आहे. वर्षभरपूर्वीही अशीच घटना लोणारे येथे घडली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details