महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किल्ले रायगडावर 348 वा शिवराज्यभिषक सोहळा - मराठा आरक्षणाची दिशा

किल्ले रायगडवर 348 वा शिवराज्यभिषक सोहळा, रात्री झाला शिरकाई देवीचा गोंधळ, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेकडे लक्ष

किल्ले रायगडवर 348 वा शिवराज्यभिषक सोहळा
किल्ले रायगडवर 348 वा शिवराज्यभिषक सोहळा

By

Published : Jun 6, 2021, 8:19 AM IST

Updated : Jun 6, 2021, 9:53 AM IST

रायगड - किल्ले रायगडावर आज 348 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे. कोविडमुळे दरवर्षी सारखी शिवभक्तांची गर्दी नसली तरी मराठा आरक्षणावर खासदार छत्रपती संभाजी महाराज काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लागून राहिले आहे.

किल्ले रायगडवर 348 वा शिवराज्यभिषक सोहळा
शिरकाई देवीचे पूजन करून केला गोंधळशनिवारी 5 मे रोजी संध्याकाळी गडपूजन झाल्यानंतर गडदेवता शिरकाई देवीचे पूजन झाले. यावेळी शिरकाई देवीसमोर गोंधळ घालण्यात आला. युवराजकुमार शहाजीराजे भोसले यांच्या उपस्थितीत हा गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रात्री शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम झाला. आज सकाळी ध्वजवंदनाने राज्याभिषेकाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.
किल्ले रायगडावर 348 वा शिवराज्यभिषक सोहळा
सुवर्ण होनद्वारे मुद्राभिषेक हा सुवर्ण योगपालखी राजसदरेवर आल्यानंतर मुख्य राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होईल. यावेळी प्रथमच सुवर्ण होनचा वापर मुद्राभिषिषेकासाठी केला जाणार आहे, हा सुवर्ण योग आहे. पालखी मिरवणुकीने या सोहळ्याची सांगता होईल. दरम्यानच्या काळात खासदार संभाजी राजे राजसदरेवरील आपल्या भाषणात काय भूमिका मांडतात ते महत्वाचे आहे.
किल्ले रायगडवर 348 वा शिवराज्यभिषक सोहळा
Last Updated : Jun 6, 2021, 9:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details