रायगड :खोपोलीतील तेज फार्महाऊसमध्ये (Khopoli Farmhouse Fighting cocks gambling) फायटर कोंबड्यांवर सट्टेबाजी (gambling on fighting cocks) करणाऱ्या 34 आरोपींना अटक (34 people arrested for gambling on fighting cocks ) करण्यात आली आहे. आरोपींकडून 76 फायटर कोंबड्या, मोठ्या प्रमाणात दारू, 24 वाहनांसह 71 लाख 78 हजार 195 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात प्राण्यांना निर्दयतेने वागवणे, जुगार कायदा आणि दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. latest news from Raigad, Raigad Crime
Gambling On Fighting Cocks : पायात धारदार हत्यारे लावत कोंबड्या झुंजवणाऱ्या 34 जणांना अटक - खोपोली फार्महाऊस
खोपोलीतील तेज फार्महाऊसमध्ये (Khopoli Farmhouse Fighting cocks gambling) फायटर कोंबड्यांवर सट्टेबाजी (gambling on fighting cocks) करणाऱ्या 34 आरोपींना अटक (34 people arrested for gambling on fighting cocks ) करण्यात आली आहे. आरोपींकडून 76 फायटर कोंबड्या, मोठ्या प्रमाणात दारू, 24 वाहनांसह 71 लाख 78 हजार 195 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. latest news from Raigad, Raigad Crime
मटणावर ताव मारत कोंबड्यांच्या झुंजीचा आनंद-काल रात्री तेज फार्महाऊसवर कोंबड्यांच्या झुंजी लावत मोठा जुगार सुरू होता. कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळण्यासाठी खास आणि शौकीन लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. मुबलक प्रमाणात दारू मांस-मटणाची मजा घेत हे जुगारी फायटर कोंबड्या झुंजवत होते. विशेष म्हणजे बाहेरून मागवलेल्या या विशिष्ठ फायटर कोंबड्यांच्या पायात धारदार हत्यारे लावली होती. जेणेकरून त्या एकमेकांवर प्राणघातक आणि जबरी वार करू शकतील.
अन् पोलिसांनी टाकली धाड-या सगळ्या प्रकाराची सूत्रांकडून खात्रिशीर माहिती मिळताच रायगड-अलिबागचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार खोपोली पोलिसांनी गगनगिरीनगर खोपोली येथील फार्महाऊसवर छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये आरोपींकडून 4 लाख 31 हजार 195 रुपये रोख, 18 हजार 700 रुपयांची अवैध दारु, 66 लाख 90 हजार किंमतीची 24 वाहने 76 फायटर कोंबडया असा एकूण 71 लाख 78 हजार 195 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून खोपीली पोलीस पुढील तपास करत आहेत.