रायगड : यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी प्रथमच मेमु गाडी ( मेनलाईन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट ) रोहा ते चिपळूण पर्यंत ये-जा करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्या दिवसभरात एकूण 32 फेऱ्या होणार असून रोहा चिपळूण दरम्यान 19 ऑगस्टपासून चालवण्यात येतील. मात्र ही मेमु पेण स्थानकातून सोडल्या गेल्यास अधिकचे 250 ते 300 प्रवासी संख्या वाढू शकते.
मेमु सेवा सुरु पेण मधून सुरु करण्याची मागणी - पेण हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून जिल्हाचे सरकारी कार्यालय अलिबागसाठी जवळचे आहे. अलिबाग येथे चिपळूण, खेड, रत्नागिरी येथील सरकारी कर्मचारी संख्या अधिक आहे. शिवाय खोपोली येथेही शेकडो प्रवासी विविध कंपन्यांमध्ये काम करणारे कोकणातील आहेत. त्यांना पेण हे जवळचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच पेण तालुक्यातील प्रवासी संख्या ही अधिक मिळू शकते. तेव्हा कोकण रेल्वेने रोहा ऐवजी पेण स्थानकातून ह्या विशेष मेमु सेवा सुरू केल्यास प्रवासी संख्या अधिक मिळेल अशी मागणी सर्व प्रवासी वर्गातून होत आहे. ( Demand to start special MEMU train from Pen to Chiplun )