महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Blue Whel Fish found : रायगडमधील घारापुरी बंदर किनारी सापडला तब्बल ३० फुटी मृत ब्लु व्हेल मासा, जाणून घ्या ... - Blue Whel Fish found

उरण तालुक्यातील जागतिक ख्यातीच्या घारापुरी बंदराच्या किनाऱ्यावर ( Gharapuri harbor coast ) 30 फूट लांबीचा मृत ब्लु व्हेल मासा ( Blue Whel Fish found ) सापडला. वनविभागाने या माश्याची नोंद करून, स्थानिक बोटींच्या साहाय्याने मुंबई-बेलापूर समुद्र प्रवाहात सोडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एम. कोकरे यांनी दिली. मात्र अ श्रेणीमध्ये मोडणाऱ्या या माशाची वनखात्याकडून विल्हेवाट लावण्याची आवश्यकता असताना, या माशाला समुद्र प्रवाहात सोडून हात वर केल्याने वनखात्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

बंदर किनारी सापडला तब्बल ३० फुटी मृत ब्लु व्हेल मासा
बंदर किनारी सापडला तब्बल ३० फुटी मृत ब्लु व्हेल मासा

By

Published : Nov 2, 2022, 7:06 PM IST

रायगड :उरण तालुक्यातील जागतिक ख्यातीच्या घारापुरी बंदराच्या किनाऱ्यावर ( Gharapuri harbor coast ) 30 फूट लांबीचा मृत ब्लु व्हेल मासा ( Blue Whel Fish found ) सापडला. वनविभागाने या माश्याची नोंद करून, स्थानिक बोटींच्या साहाय्याने मुंबई-बेलापूर समुद्र प्रवाहात सोडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एम. कोकरे यांनी दिली. मात्र अ श्रेणीमध्ये मोडणाऱ्या या माशाची वनखात्याकडून विल्हेवाट लावण्याची आवश्यकता असताना, या माशाला समुद्र प्रवाहात सोडून हात वर केल्याने वनखात्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

बंदर किनारी सापडला तब्बल ३० फुटी मृत ब्लु व्हेल मासा

ब्लु व्हेल मासा असल्याची पुष्टी -घारापुरी बंदर म्हणजेच एलिफंटा आयलँड हे त्यावर असणाऱ्या लेण्यांमुळे जगविख्यात असून, या लेणी पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक हजारोंच्या संख्येने येथे येत असतात. मंगळवारी संध्याकाळच्या वेळेस येथील प्रावाशी जेट्टीच्या बाजूला एक महाकाय मासा मृत असल्याचे आढळून आले. यावेळी सरपंच बळीराम ठाकूर यांनी तत्काळ याची माहिती पोलीस ठाणे तसेच वनविभागाला दिली. या जेट्टीवरून हजारो पर्यटक ये-जा करत असतात, या पर्यटकांमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये. तसेच कुजलेल्या अवस्थेमधील या माशामुळे रोगाची लागण होऊ नये, यासाठी हा मासा येथून तात्काळ हलवणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे होते. वनपरिक्षेत्र अधिकारी एन.एम.कोकरे यांनी माशाची पाहणी करून हा मासा ब्लु व्हेल प्रजातीमधील असून, त्याची लांबी ३० फूट तर वजन ७ ते ८ टन असल्याचे सांगितले. तर या माशाला बोटींच्या साहाय्याने मुंबई- बेलापूर समुद्री प्रवाहात सोडला असल्याचेही सांगितले आहे.

बंदर किनारी सापडला तब्बल ३० फुटी मृत ब्लु व्हेल मासा


विल्हेवाट न लावताच सोडले समुद्रात - ब्लु व्हेल या माशाची प्रजाती ही नष्ट होण्याच्यामार्गावर असल्याने ही प्रजाती जागतिक स्थरावर संरक्षित आहे. यामुळे हा मासा प्रथम श्रेणीमध्ये मोडला जातो. अशा प्रकारे मासा आढळल्यास त्याची विल्हेवाट लावण्याची जवाबदारी ही वनखात्याची असते. अशामध्ये घारापुरी येथे आढळून आलेल्या या माशाला वनविभागाने विल्हेवाट न लावताच पुन्हा समुद्राच्या प्रवाहात सोडून दिल्याने मात्र वनखात्याबाबत नाराजी व्यक्त केले जात आहे. अशाच प्रकारे उरण माणकेश्वर समुद्रकिनारी ०१८ साली सापडलेल्या मृत व्हेल माशाचा सापळा ऐरोली, नवी मुंबई येथील संग्राहलयात करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details