रायगड- खोपोली वासरंग येथील मस्को कंपनीत वेल्डिंग गॅसचा स्फोट होऊन तीन कामगार भाजल्याची घटना घडली आहे. कंपनीतील एस.एम.एस विभागात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मेहबूब शेख, प्रवीण जाधव, राजकुमार सरोज असे भाजलेल्या कामगारांची नावे आहेत. यापैकी गंभीर जखमी झालेल्या दोन कामगारांना मुंबई येथे हलविण्यात आले असून एकावर खोपोलीतील साबणे रुग्णालयात उपचार सुरू आहे.
खोपोली वासरंग येथे मस्को कंपनीत स्फोट; ३ गंभीर जखमी - Explosion in masco company
खोपोली वासरंग येथील मस्को कंपनीत वेल्डिंग गॅसचा स्फोट होऊन तीन कामगार भाजल्याची घटना घडली आहे. मेहबूब शेख, प्रवीण जाधव, राजकुमार सरोज असे भाजलेल्या कामगारांची नावे आहेत. यापैकी गंभीर जखमी झालेल्या दोन कामगारांना मुंबई येथे हलविण्यात आले असून एकावर खोपोलीतील साबणे रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सदरील तिघांपैकी एक कर्मचारी ठेकेदार आहे. खोपोलीमधील वासरंग गावात मस्को कंपनी असून यामध्ये महिंद्रा स्टीलचे उत्पादन काढले जाते. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मेहबूब शेख, प्रवीण जाधव, राजकुमार सरोज हे तिघेही कंपनीत वेल्डिंगचे काम करत होते. त्यावेळी वेल्डिंग गॅसचा स्फोट झाला. यात उपरोक्त तिघेही कामगार भाजून गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर तिघांना खोपोली येथील साबणे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना मुंबई येथील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले आहे.