नवी मुंबई - रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरातील थळ येथील आरसीएफ कंपनीत बॉयलरमध्ये स्फोट ( Explosion in boiler at RCF Company ) झाला आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू ( Boiler explosion in RCF company, 3 dead ) झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली ( RCF company Boiler explosion) आहे. आज संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान आरसीएफ कंपनीतील एसीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाला आहे.
RCF Company Boiler Explosion : अलिबागच्या आरसीएफ कंपनीत स्फोट, ३ ठार तर ६ जखमी - आरसीएफ कंपनीत बॉयलरचा स्फोट ३ जणांचा मृत्यू
अलिबाग परिसरातील थळ येथील आरसीएफ कंपनीत बॉयलरमध्ये स्फोट ( Explosion in boiler at RCF Company ) झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू ( Boiler explosion in RCF company, 3 dead ) झाल्याची प्रार्थमिक माहिती समोर आली आहे.
तिघांचा मृत्यू, सहा जण जखमी -अलिबाग तालुक्यातील थळ, वायशेत येथील आरसीएफ कंपनीत गॅस टर्बाइन युनिटच्या रेफ्रिजरेशन प्लांटमध्ये भीषण स्फोट झाला. ही घटना बुधवारी (दि.19) सायंकाळी साडेच्या सुमारास घडली. या अपघातात एक मॅनेजमेंट ट्रेनीसह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट झाल्यावर त्वरित अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना आरसीएफ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना ऐरोली येथील बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार थळ येथील आरसीएफ कंपनीत झालेल्या स्फोटात काही कर्मचारी जखमी झाले असून तीन मृत झाले आहेत.
स्फोटात मृत पावलेल्या व्यक्तींची माहिती-दिलशाद आलम इद्रिसी- वय 29 - कुर्ला पश्चिम, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी2)फैजान शेख- वय 33- कुर्ला पश्चिम, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी3)अंकित शर्मा- वय 27- आर.सी.एफ कर्मचारी आहे. सहा कामगार ठेकेदाराचे आहेत तर एक ट्रेनी इंजीनिअर आरसीएफचा असल्याचाही माहिती मिळाली आहे. एरिझाे ग्लाेबल या ठेकेदाराला एसी सप्लायचे काम आरसीएफ कडून देण्यात आले हाेते नवीन एसी युनीटमध्ये एसी इन्स्टाॅलेशनचे काम सुरुअसताना हा स्फाेट झाला आहे.