रायगड - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिटच्या वळणावर एका मालवाहू टेम्पोला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना आज(29 डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. हा टेम्पो नागपूरहून नागोठणे येथे जात होता.
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस सुरक्षा दल आणि 'अपघातग्रासतांच्या मदतीला' ग्रुपच्या सदस्यांनी मृतांना बाहेर काढून जखमींना उपचारासाठी पनवेल येथील रूग्णालयात दाखल केले आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.