महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेशोत्सव; जिल्ह्यात 287 सार्वजनिक तर 1 लाख घरगुती गणराय होणार विराजमान

रायगड जिल्हत यावर्षी घरगुती 1 लाख 239 तर सार्वजनिक 287 गणराय विराजमान होणार आहेत. कोरोनामुळे यावर्षी काही सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव रद्द केला आहे. मात्र गणेशभक्त घरगुती गणेशोत्सव हा उत्साहातच साजरा करणार आहेत.

raigad
गणेश मूर्ती

By

Published : Aug 18, 2020, 6:26 PM IST

रायगड - विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सव सणावर यावेळी कोरोनाचे संकट आहे. असे असले तरी कोकणी माणूस हा गणेशोत्सव सण तेवढ्याच श्रद्धेने साजरा करणार हे मात्र नक्की. रायगड जिल्हत यावर्षी घरगुती 1 लाख 239 तर सार्वजनिक 287 गणराय विराजमान होणार असल्याची महिती जिल्हा पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान कोरोनामुळे यावर्षी काही सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव रद्द केला आहे.

गणेशोत्सव म्हणजे कोकणासह रायगडकरांचा आवडता सण. गणरायाच्या आगमनाची तयारी गणेशभक्तांनी सुरू केली आहे. यावर्षी कोरोना संकट असल्याने शासनाने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. घरगुती 2 तर सार्वजनिक मंडळाची गणेशमूर्ती 4 फुटी विराजमान करायची आहे. सार्वजनिक मंडळांनी यावर्षी गणेशोत्सव साजरा करू नका असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून मंडळांना केले आहे. त्याला काही सार्वजनिक मंडळांनी प्रतिसाद दिला आहे. तर काहीं मंडळे साधेपणाने उत्सव साजरा करणार आहेत. यासाठी त्यांना हमीपत्र लिहून द्यायची आहेत. जिल्ह्यात 287 सार्वजनिक मंडळ गणरायाची स्थापना करणार आहेत. त्यांना शासन आणि प्रशासनाने दिलेली नियमानुसार गणेशोत्सव साजरा करायचा आहे.

जिल्ह्यात यावर्षी काही सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव रद्द केला असला तरी घरगुती गणराय हे लाखोंच्या घरात विराजमान होणार आहेत. त्यादृष्टीने घरोघरी गणरायाच्या आगमनाची तयारी गणेशभक्त करू लागले आहेत. साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तरीही घरगुती गणेशोत्सव हा उत्साहातच साजरा होणार हे गणरायाच्या संख्येवरून दिसत आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details