महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसची आराम बसला धडक; 2 ठार - एक्सप्रेस वे

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर मिनीबस आणि आरामबसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २ प्रवासी ठार झाले. अपघातात मिनीबसचा चुराडा झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

चुराडा झालेली मिनीबस

By

Published : May 20, 2019, 9:49 AM IST

Updated : May 20, 2019, 11:06 AM IST

रायगड- मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर हद्दीत मिनीबस व आराम बसचा अपघात होऊन 2 जण जागीच ठार झाले. तर 18 जण जखमी झाले आहेत. जोसेफ सेरेजो (62) व कांबळे असे अपघातात ठार झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. जखमी प्रवाशांना खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त गाड्या


वसई येथून 20 प्रवासी महाबळेश्वर येथे मिनी ट्रॅव्हल्सने (एमएच 48, एवाय 8080) सहलीसाठी सकाळी निघाले होते. ट्रॅव्हल्स बस पुण्याकडे जाताना खालापूर हद्दीत माडप ब्रिजजवळ भरधाव वेगाने आली. यावेळी मिनीबसने पुढे उभ्या असलेल्या आराम बस ( जिजे 14, व्ही 5007) ला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की मिनी बसचा समोरील भाग पूर्ण आत गेला आहे.


अपघातानंतर डेल्टा फोर्स, आर्यन, एक्सप्रेस वे वाहतूक पोलीस मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे पुण्याकडे जाणारी एक लेन बंद झाली असून वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.


जखमींची नावे


फलॉरी जोसेफ सेरेजो (50), अॅलिसन जोसेफ सेरेजो ( 30 ), आलफिया जोसेफ सेरेजो (23) , नाबर्ट सेरेजो (60), अर्णेला सेरेजो (54) , क्रिस्‍टल सेरेजो ( 22 ), सलाईन सेरेजो (17 ), मार्शल सेरेजो (72) , फलॉरी परेरा (70 ), स्‍टॅनी परेरा (75 ), जॉयनेल सिल्‍वेरा (35 ), वंदना वर्तक (35 ), कृतांगी वर्तक (6 ), जयप्रकाश वर्तक (48) , ब्रायन सिल्‍वेरा (50) , प्रिती घोन्‍सालवीस (25) , वैशाली डिमेलो (26) , संजय डिमेला (28)

Last Updated : May 20, 2019, 11:06 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details