रायगड - निसर्गाचा कोप हा रायगड जिल्ह्यातील पाच ते सहा तालुक्यांना उधवस्त करून गेला आहे. जिल्ह्यातील 1 हजार 905 गावे या वादळाने बाधित झाली असून, 1 लाख 75 हजार घरांचे नुकसान झाले आहे. यापैकी 15 हजार कुटुंबाची घर पूर्णतः उधवस्त झाली आहेत. वादळात 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
रायगड जिल्ह्यातील 1 हजार 905 गावे चक्रीवादळाने बाधित, 15 हजार घर उधवस्त अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, माणगाव, तळा, म्हसळा, रोहा, पेण तालुक्यातील 18 हजार हेक्टर फळबागा नेस्तनाबूत झाल्या असून साधारण 45 कोटींचे नुकसान झाले आहे. 49 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. नागरिकांच्या घरासह 183 शासकीय इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या वादळाचा फटका हा महावितरणला पडला असून, हजारो विजेचे खांब, ट्रान्सफार्मर कोलमडून पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या पाणी योजना बंद पडल्या आहेत. जिल्ह्यातील रायगडकरांचे करोडोचे नुकसान झाले असले तरी हळूहळू रायगडकर आता सावरू लागला आहे.
रायगड जिल्ह्यातील 1 हजार 905 गावे चक्रीवादळाने बाधित, 15 हजार घर उधवस्त निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, रोहा, अलिबाग या तालुक्यान जास्त बसला आहे. पेण, खालापूर, कर्जत या तालुक्यांमध्ये देखील नुकसान झाले आहे. विजेचे हजारो खांब, ट्रान्सफार्मर पडले आहेत. आजही अनेक गावे अंधारात आहेत. वीजपुरवठा नसल्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. जेथे शक्य आहे तेथे जनरेटरच्या सहाय्याने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून पाणी पुरवठा केला जात आहे. शक्य आहे तेथे पर्यायी जल स्त्रोतातून पाणीपुरवठा दिला जात आहे. रायगड जिल्ह्यातील 1 हजार 905 गावे चक्रीवादळाने बाधित, 15 हजार घर उधवस्त ज्यांची घर पूर्णपणे उधवस्त झाली आहेत, त्यांना एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. ज्यांच्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे, त्यांना देखील मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरातील भांड्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना भांडी खरेदीसाठी मदत देण्यात येणार आहे. मृत व्यक्तींच्या वारसांना देखील मदत देण्यात येणार असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड येथे जमिनीखालून विजवाहिन्या टाकण्याचे काम वर्षभरात पूर्ण करण्यात येईल. उरण व श्रेवर्धन येथे जमिनीखालून वीजवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. यापुढे सर्व शासकीय इमारतींचे बांधकाम वादळ प्रतिरोधक पद्धतीनेच केले जाईल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हॅम रेडीओ केंद्र सुरु करण्यात येईल. प्रत्येक गावात एक तरी वादळ प्रतिरोधक पद्धतीने बांधलेली इमारत उभारण्यात येणार असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.