रायगड- माणगाव तालुक्यातील विळभगाड औद्योगिक क्षेत्रातील क्रीपझो प्रा. लि. कंपनीत आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये 18 जण जखमी झाले आहेत. यातील ५ कर्मचारी हे गंभीर भाजल्याने त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर, इतर कर्मचाऱ्यांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही कंपनी आग विझवण्यासाठी आवश्यक असलेली सिस्टम तयार करते.
क्रीपझो कंपनी ही आग विझविण्यासाठी आवश्यक असलेली सिस्टम बनवणारी कंपनी आहे. ही सिस्टम गॅसच्या साहाय्याने तयार केली जाते. शुक्रवारी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास कंपनीमध्ये डेमो अधिकारी आणि कर्मचारी काम करीत असताना सिलेंडरला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आणि डेमो केलेल्या खोलीच्या बाहेर आली. त्याचवेळी डेमो रूमच्या बाहेर उभे असलेले 18 कामगार आगीच्या संपर्कात येऊन भाजले गेले.
हेही वाचा - 'साहेब..लेकरासारख्या बागा वाढवल्या अन् होत्याचं नव्हतं झालं'