महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यातील १५ हजार ७३२ जणांना जनआरोग्य योजनेतून लाभ - रायगड जनआरोग्य योजना

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत वर्षभरात रायगड जिल्ह्यातील 15 हजार 732 नागरिकांना आपल्या विविध आजारावर मोफत उपचार रुग्णालयात मिळाले आहेत. त्याचबरोबर सध्या थैमान घालणाऱ्या कोरोना आजारात लागण झालेल्या जिल्ह्यातील 2 हजार 847 जणांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

Jan Arogya Yojana
Jan Arogya Yojana

By

Published : Jun 16, 2021, 7:19 PM IST

रायगड - महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत वर्षभरात जिल्ह्यातील 15 हजार 732 नागरिकांना आपल्या विविध आजारावर मोफत उपचार रुग्णालयात मिळाले आहेत. त्याचबरोबर सध्या थैमान घालणाऱ्या कोरोना आजारात लागण झालेल्या जिल्ह्यातील 2 हजार 847 जणांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत 28 कोटी 17 लाख 39 हजार 400 रुपये इतका निधी विविध आजारावर शासनाने खर्च केला आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी लाभदायक ठरली आहे, अशी माहिती योजनेचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. वैभव गायकवाड यांनी दिली आहे.

आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्यांना योजनेचा लाभ -

आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या व्यक्तीला एखादा मोठा आजार झाला की रुग्णालयाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्याच्यासह कुटूंबाला पडत असतो. त्यामुळे उधार उसनवारी करून आजारी व्यक्तीला बरे करण्यासाठी धडपड सुरू होते. यात तो व्यक्ती कुटूंब कर्जबाजारी होतो. शासनाने एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटूंबाना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत 971 आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया शासकीय आणि काही खाजगी रुग्णालयात मोफत केली जाते. या योजने अंतर्गत दीड लाखापर्यत इतर आजारासाठी तर कॅन्सर आजारासाठी अडीच लाखाची मदत मिळते. कोरोना आजार ही या योजनेत सामावून घेतला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांनाही या योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे.

28 कोटी 17 लाख 39 हजार 400 रुपये खर्च -

रायगड जिल्ह्यात 1 एप्रिल 2020 पासून ते 1 एप्रिल 2021 या कालावधीत 15 हजार 732 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 2 हजार 847 कोरोना रुग्णांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे. वर्षभरात 28 कोटी 17 लाख 39 हजार 400 रुपये निधी शासनाने विविध आजारावर खर्च केला आहे. रायगड जिल्ह्यात 22 रुग्णालयात ही योजना लागू असून 9 खाजगी तर 13 शासकीय रुग्णालयात या योजने अंतर्गत रुग्णावर मोफत उपचार केले गेले आहेत.

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन -

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माहितीसाठी जिल्हा शासकीय तसेच ग्रामीण, प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य मित्र याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आरोग्य मित्रांकडे संपर्क करा असे आवाहन डॉ. वैभव गायकवाड यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details