रायगड - पोलादपूरजवळील कशेडी घाटात चिपळूण-परळ एसटी बसने ओव्हरटेकच्या प्रयत्नात कंटेनरला दिली धडक दिली. या अपघातात 14 जखमी प्रवासी जखमी झाले असून जखमींवर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात ऊपचार सुरू आहेत.
कशेडी घाटात एसटीचा अपघात, 14 प्रवासी जखमी - 14 प्रवासी जखमी
पोलादपूरजवळील कशेडी घाटात चिपळूण-परळ एस.टी. बसने ओव्हरटेकच्या प्रयत्नात कंटेनरला दिली धडक दिली. यात 14 प्रवासी जखमी झाले आहे.
अपघातग्रस्त एसटी बस
एस.टी.चालक सतत वाहनांना ओव्हरटेक करीत बेपर्वाईने बस चालवत असल्याने कंटेनरला ठोकर दिल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. महाड डेपोचे एसटी वाहतूक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी प्रवाशांना मार्गस्थ करण्यास मदत केली.
चिपळूण-परळ ही एसटी बस एकूण 30 प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली होती. त्यापैकी या अपघातात 14 जणांना दुखापती झाली आहे. पुढील तपास पोलादपूर पोलीस अधिक खाडे या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.