महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' 12 जणांमुळे रायगडात भीतीचे वातावरण

निजामुद्दीन येथे मरकझ या धार्मिक कार्यक्रमासाठी तबलिगी समुदायातील अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रायगडमधील 14 नागरिकांना या ठिकाणी सहभाग घेतला होता. या 14 पैकी 13 नागरिक जिल्ह्यात दाखल झाले असून एकाचा शोध सुरू आहे.

Raigad Corona Update
रायगड कोरोना अपडेट

By

Published : Apr 2, 2020, 11:06 AM IST

रायगड - राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकझ या धार्मिक कार्यक्रमासाठी तबलिगी समुदायातील अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याच धार्मिक कार्यक्रमात रायगड, ठाणे आणि इतर जिल्ह्यातील 42 जणांनी हजेरी लावली होती. रायगडमधील 14 नागरिकांना या ठिकाणी सहभाग घेतला होता.

या 14 पैकी 13 नागरिक जिल्ह्यात दाखल झाले असून एकाचा शोध सुरू आहे. 12 जणांची वैद्यकीय तपासणी होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. मात्र, या 12 जणांमुळे रायगड जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा -LIVE : महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 338 वर, धारावीतील रूग्णाचा मृत्यू

दिल्लीहून आलेल्या 12 जणांची पनवेल येथे तपासणी सुरू करण्यात आली असून त्या सर्वांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, या 12 जणांमुळे जिल्ह्यातील जनता भयभीत झाली आहे. दिल्ली येथे झालेल्या या धार्मिक संमेलनात हजारो नागरिक एकत्र आले होते. त्यातील काहींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तमिळनाडूमध्ये तर एकाचा मृत्यूही झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details