रायगड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत आहे. अशा वेळी अलिबाग शहराला लागून असलेल्या कुरूळ ग्रामपंचायतीने स्वतः हून गावात आज शंभर टक्के जनता कर्फ्यू जाहीर केला असून, नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
कुरुळ ग्रामस्थांचा 'एक दिवस गावसाठी' जनता कर्फ्यू - कुरुळ ग्रामस्थांचा 'एक दिवस गावसाठी' जनता कर्फ्यु
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदंनी देशभर लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, काही ठिकाणी त्याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत आहे. अशा वेळी अलिबाग शहराला लागून असलेल्या कुरूळ ग्रामपंचायतीने स्वतः हून गावात आज शंभर टक्के जनता कर्फ्यू जाहीर केला
'एक दिवस गावसाठी' ही संकल्पना कुरुळ ग्रामपंचायताचे सरपंच अॅड. जनार्दन पाटील यांनी गावात राबवली आहे. त्यामुळे कुरुळ गाव हे आज पूर्णतः निर्मनुष्य पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी काळात अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा असे जिल्हाधिकारी यांचे आदेश नागरिकांना दिले आहेत. मात्र, संचारबंदी काळात नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आदेश असताना नागरिक बाहेर पडत आहेत. गर्दी टाळणे महत्त्वाचे असून, त्यामुळे कोरोनासारख्या शत्रूला ठरविण्यास मदत होणार आहे. मात्र, याकडे नागरिक अजूनही कानाडोळा करत आहेत. प्रशासनाला नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे.