महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यातील 88 पैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध

रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीपैकी दहा ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्या आहेत.

रायगड जिल्हा ग्रामपंचायत निवडणूकRaigad District Gram Panchayat Election
रायगड जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक

By

Published : Jan 5, 2021, 4:45 PM IST

रायगड -रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीपैकी दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 78 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. 88 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 840 सदस्यपदासाठी 1588 उमेदवार रिगणात आपले नशीब आजमावणार आहेत. 848 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता पुढील आठ दिवस गावागावात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

1588 उमेदवार निवडणूक रिंगणात-

रायगड जिल्ह्यातील मार्च ते सप्टेंबर महिन्यात मुदत संपलेल्या 88 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 88 ग्रामपंचायतीत 311 प्रभाग संख्येत 840 सदस्य संख्या आहे. 840 सदस्य पदासाठी 2475 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 30 डिसेंबर रोजी झालेल्या छाननीत 39 उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते. 4 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 848 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता 840 सदस्य पदासाठी 1588 उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत.

कोण मारणार बाजी-

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कोरोना महामारीमुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता असली तरी काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष वेगवेगळे लढवून आपली ताकद आजमावत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात 18 जानेवारी रोजी निकालानंतर कोण बाजी मारणार, हे स्पष्ट होणार आहे.

10 ग्रामपंचायती बिनविरोध-

पनवेल तालुक्यातील आकुर्ली, खानावेळ, कर्जतमधील हूमगाव, माणगावमधील देवळी, टेमपाले, लाखपाले, महाडमधील बेलोशी, आसनपोई, श्रीवर्धन मधील कारीवणे तर म्हसळामधील केलटे या दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

848 उमेदवारांनी घेतली माघार-

उमेदवारी अर्ज मागे घेण्यची अंतिम तारीख 4 जानेवारी होती. या कालावधीत अलिबाग तालुक्यात 57, पेण 69, पनवेल 252 , उरण 64 , कर्जत 111 , रोहा 224 , माणगाव 21 , महाड 17 , श्रीवर्धन 23 , म्हसळा 10 अश्या एकूण 848 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता अलिबाग तालुक्यात 80, पेण 110, पनवेल 432, उरण 172, कर्जत 181, रोहा 374, माणगाव 58, महाड 76, श्रीवर्धन 73, म्हसळा 32 असे एकूण 1588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

तालुकानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती संख्या-

अलिबाग 4, पेण 7, पनवेल 24, उरण 6, कर्जत 9, रोहा 21, माणगाव 5, महाड 5, श्रीवर्धन 4, म्हसळा 3

हेही वाचा- ही कसली शिवसेना, ही तर औरंगजेबसेना- केशव उपाध्ये

ABOUT THE AUTHOR

...view details