पुणे : पुणे शहरात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला ( Zika Patient Found in Pune City ) आहे. 18 नोव्हेंबरला 67 वर्षांच्या एका व्यक्तीत याची लक्षणे दिसून आली. पुणे जिल्ह्यातील बावधन इथं हा रुग्ण सापडला आहे. 16 नोव्हेंबरला हा रुग्ण पुण्यातील जहांगीर रुग्णालयात ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा या कारणांसाठी वैद्यकीय सल्ल्यासाठी आला होता. त्याच्या रक्ताचे नमुने खाजगी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असात हा रुग्ण झिका बाधीत असल्याचे निश्चित ( What are the symptoms of Zika virus ) झाले.
रुग्णाचा तपशील :रुग्णाचे वय ६७ वर्षे आहे. १६२२ रोजी जन्म झाला. बावधन इथे रूग्ण राहतो. ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा याकारणांसाठी बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय सल्ल्यासाठी आला होता. खाजगी प्रयोगशाळेत १८ नोव्हेंबर २०२२ रोजी झिका बाधित असल्याचे सिध्द झाले. दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी एन आय व्ही पुणे यांच्या तपासणीत हा रुग्ण झिका बाधीत असल्याचे निश्चित झाले.
घरातील एकही संशयीत नाही :दिनांक २२ नोव्हेंबर रोजी पुणे महानगरपालिकेच्यावतीने या भागात रोग नियंत्रण कार्ययोजना करण्यात आली. रुणाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यात एकही संशयित आढळला नाही. या भागात डासोत्पत्तीसाठी सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले तथापी या भागात एडीडास उत्पती नाही. या भागात धूर फवारणी करण्यात आली.