दौंड(पुणे)-युवासेना पदाधिकारी निवडी येत्या पंधरा दिवसात होतील,पदाला न्याय देणाऱ्या युवा सैनिकांनीच पदासाठी आग्रही रहावे. प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा कार्य अहवाल प्रत्येक महिन्याच्या शेवटी घेतला जाईल. मी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व देतो. संघटना चोवीस तास कार्यरत ठेवण्यासाठी मी दौंड विधानसभा मतदार संघातील प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी चोवीस तास उपलब्ध असेल. असे आश्वासन युवासेना राज्य विस्तारक गणेश कवडे यांनी शिवसैनिकांना दिले. दौंड विधानसभा मतदार संघामध्ये पदाधिकारी आढावा व निवड बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ते बोलत होते.
दौंड विधानसभेवर भगवा फडकवायचाच- युवासेना राज्य विस्तारक गणेश कवडे
युवा सेना ही शिवसेनेचे मुख्य अंगिकृत संघटना आहे. युवा सेना आणि शिवसेना मिळून दौंड विधानसभेवर भगवा फडकवायचाच, असा विश्वासही यावेळी कवडे यांनी व्यक्त केला आहे.
दौंड विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे
कार्यकर्त्यांना संबोधित करतांना गणेश कवडे म्हणाले की, पदाधिकाऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होईल. युवा सेना ही शिवसेनेचे मुख्य अंगिकृत संघटना आहे. युवा सेना आणि शिवसेना मिळून दौंड विधानसभेवर भगवा फडकवायचाच, असा विश्वासही यावेळी कवडे यांनी व्यक्त केला आहे. बारामती लोकसभा राज्य विस्तारक पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना दौंड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने महेश पासलकर यांच्या हस्ते कवडे यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला.
हेही वाचा-संजय राऊत वाझेंना का पाठिशी घालताहेत? भाजपचा शिवसेनेवर निशाणा
हेही वाचा-मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी