महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राणे पिता-पुत्राविरोधात युवासेना आक्रमक, पुण्यात केले आंदोलन - निलेश राणे बातमी

भाजपचे नेते नारायण राणे व त्यांचे दोन्ही माजी खासदार निलेश व आमदार नितेश राणे यांच्याविरोधात युवासेनेकडून पुण्यातील नगररोड वाघोली येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात युवासैनिक उपस्थित होते.

Agitator
आंदोलक

By

Published : Mar 18, 2021, 3:40 PM IST

पुणे - भाजपचे नेते नारायण राणे व त्यांचे दोन्ही माजी खासदार निलेश व आमदार नितेश राणे यांच्याविरोधात युवासेनेकडून पुण्यातील नगररोड वाघोली येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात युवासैनिक उपस्थित होते.

आंदोलन

काय आहे प्रकरण ..?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या सदनिकेबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंनी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर टीका केली आहे. याविरोधा युवासेना मैदानात उतरली असून पुण्यातील युवासैनिकांकडून नगररोड वाघोली येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोटू, पतलू कार्टूनच्या गळ्यात राणे पिता-पुत्राच्या नावाच्या पाट्या अडकविण्यात आल्या. कोंबडी चोर, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा युवासेना प्रमुख मच्छिंद्र सातव यांसह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -उजनी जलाशयाचा वापर जल हवाई वाहतुकीसाठी करावा- सुप्रिया सुळे

ABOUT THE AUTHOR

...view details