महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Youths Sholay Style Protest : अखेर चार तासानंतर पठ्ठ्या उतरला ब्रिजवरून; तहसीलदारावर कारवाईसाठी केले शोले स्टाईल आंदोलन

जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करावी या मागणीसाठी, पुण्यातील संचेती पुलावर एका तरुणाकडून गेल्या 4 तासापासून शोले स्टाईल आंदोलन केले. अखेर प्रशासनाकडून त्याच्या मागण्याची दखल घेण्यात आली आणि या पठ्ठ्याने आपल उपोषण मागे घेतले आहे.

Youths Sholay Style Protest
शोले स्टाईल आंदोलन

By

Published : May 30, 2023, 10:26 PM IST

शोले स्टाईल आंदोलन करताना तरूण

पुणे: शोले स्टाईल आंदोलन आतापर्यंत वेगवेगळ्या मागण्यासाठी झाले आहे. परंतु तहसीलदारावर कारवाई करण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले आहे. संचेती पुलावर हातात एक फलक घेऊन तरूण पुलावर चढला. त्या फलकामध्ये जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होती. जो पर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी पुलावरच बसून राहणार आहे.अशी भूमिका यावेळी त्याने मांडली होती. 4 तासांच्या स्टंटबाजी नंतर हा तरुण वर चढला असून खडकी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.


तहसीलदारांनी मागितले दाद: महेंद्र संपत डवखर असे या तरुणांच नाव आहे. महेंद्रहा मुळचा जुन्नर तालुक्यातील सुल्तानपुर गावचा आहे. या गावात महेंद्रच्या नातेवाईकांच्या नावे एक हेक्टर 64 गुंठे जमीन आहे. ही जमीन डावखर कुटुंबांच्या सामाईक मालकीची आहे. या जमिनीवर महेंद्रचे वडील संपत आणि चुलत्यांची नावे आहेत. मात्र जमिनीच्या फेरफार नोंदीवर महेंद्रचे वडील संपत डावखर यांचे नाव नाही. फेरफार नोंदीवर वडीलांचे नाव लागावे यासाठी महेंद्र गेले अनेक महिने प्रयत्न करत आहे. 12 डिसेंबर 2022 ला त्याने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्रही दिले होते. त्याआधी जुन्नरच्या तहसीलदारांना त्याने अर्ज दिला होता. मात्र दाद मिळाली नाही.

जमिनीच्या फेरफार नोंदीवर वडीलांचे नाव लागावे यासाठी महेंद्र गेले अनेक महिने प्रयत्न करत आहे. 12 डिसेंबर 2022 ला त्याने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्रही दिले होते. त्याआधी जुन्नरच्या तहसीलदारांना त्याने अर्ज दिला होता. मात्र दाद मिळाली नाही. जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करावी यासाठी केले आंदोलन - महेंद्र संपत डवखर

शोले स्टाईल आंदोलन केले: महेंद्रचे वडील 25 मे पासून जुन्नर तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करत आहे. मात्र तरीही दखल घेतली जात नसल्याने महेंद्र डावखर उड्डाणपूलाच्या कठड्यावर जाऊन बसलाय. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या विनंतीला तो दाद दिला नाही. तहसीलदार कार्यालयाकडून मात्र त्याच्याशी अद्याप संपर्क साधण्यात आलेला नाही. दरम्यान शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महेंद्र सोबत फोनवरून संपर्क साधला असून, उद्या त्यांच्या कार्यालयात आल्यास प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र महेंद्र डावखर याने त्यांनाही दाद दिलेली नाही. म्हणून त्याने आज पुण्यात येऊन शोले स्टाईल आंदोलन केले आहे.

हेही वाचा -

  1. Sholay Style Agaitation in Beed तरुणाचे मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन वाचा काय आहे प्रकरण
  2. Youths Sholay Style Protest तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन बायको नांदायला येत नाही म्हणून स्वीकारला मार्ग
  3. दारूबंदीसाठी बोरगावात तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details