पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. मयूर मधुकर वाघ वय-२६ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नुकताच दहा दिवसांपूर्वी त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या - undefined
पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मयूर मधुकर वाघ वय-२६ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथे नक्षत्र सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावरून तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मयूर हा आई वडिलांसह राहत होता. तो एका डिझायनिंग वर्क करणाऱ्या कंपनीत कामाला होता. अद्याप त्याने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. त्याचा तपास पोलीस घेत आहेत.
आज सकाळी साडेसहाच्या सुमारास राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून मयूर ने उडी घेतली. त्याला जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, मोठा रक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वीच मयूरचा मृत्यू झाला होता. मयूरचे वडील हे बँकेत कामाला होते. तर बहिणीचे देखील लग्न झालेले आहे. त्यामुळे आई वडिलांचा तो एकमेव सहारा होता. या घटनेमुळे वाघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.