महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओळख पटत नसल्याने मृतदेह शवागारात पडून - मृतदेह शवागारात पडून

पिंपरी डेअरी फार्मच्या परिसरात मोकळ्या जागेत लिंबाच्या झाडाला 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यावेळी हा तरुण बेशुद्ध अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. तातडीने तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

ऑक्टोंबरमध्ये तरुणाची आत्महत्या

By

Published : Nov 7, 2019, 4:52 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील डेअरी फार्म परिसरात एका 25 वर्षीय तरुणाने कडू लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडली असून अद्याप या तरुणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. अद्याप या तरुणाचे नाव समजू शकले नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांना माहिती मिळाली नसल्यामुळे मृतदेह शवगृहात पडून आहे. संबंधित मृत तरुणाच्या नातेवाईकांचा शोध पिंपरी पोलीस घेत आहेत.

हेही वाचा - खेडसह ४ तालुक्यात धुक्याची चादर, पिकांना फटका बसण्याची शक्यता

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी डेअरी फार्मच्या परिसरात मोकळ्या जागेत लिंबाच्या झाडाला 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यावेळी हा तरुण बेशुद्ध अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. तातडीने तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, तरुणाचा मृतदेह हा शवगृहात पडून आहे.

हेही वाचा -पुणे शहरावर पसरली धुक्याची चादर, गुलाबी थंडीची चाहूल...

तरुणाने निळ्या, पांढऱ्या रंगाचा हाफ टी शर्ट, निळी जीन्स पॅन्ट, काळ्या रंगाचे बूट, ब्राऊन रंगाचा बेल्ट, दाढी वाढलेली, केस काळे, हातावर गोंदलेले, तसेच बोटावर डी असे गोंदले आहे. या तरुणाच्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत आहेत. वरील वर्णनाच्या तरुणाबाबत माहिती असल्यास पिंपरी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक निकम यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details