महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune youth Suicide : महिलेच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल - खडक पोलिस स्टेशन

पुणे येथील हरकानगर भवानी पेठेत राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केली. नयन नरेंद्र मोरे असे या युवकाचे नाव असुन, पाण्यात उडी मारुन त्याने आपले जीवन संपविले. घराशेजारी राहणाऱ्या जेबा सय्यद नावाच्या महीलेशी त्याचा वाद झाला होता. त्याच तणावातुन त्याने हे पाऊल उचल्याचा आरोप, त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. खडक पोलिसांनी जेबा सय्यद या महिलेला अटक केली आहे.

Pune youth Suicide
तरुणाची आत्महत्या

By

Published : Jul 27, 2022, 3:57 PM IST

पुणे:वाद झाल्याच्या कारणातून महिलेने दिलेल्या त्रासाला कंटाळून, एका तरुणाने पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नयन नरेंद्र मोरे (वय.20,रा. हरकारनगर भवानी पेठ) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सोमवारी त्याचा मृतदेह वैदवाडी कॅनॉल हडपसर येथे आढळून आला. नुतन बाहुले (वय.26,रा. भवानीपेठ) याने नोंदविल्या तक्रारीनुसार , खडक पोलिसांनी जेबा सय्यद (वय.30,रा. भवानीपेठ) या महिलेला अटक केली आहे. त्यानुसार जेबा हिच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आत्महत्या केलेला तरुण नयन आणि आरोपी महिला जेबा हे भवानी पेठ येथे शेजारी राहतात. आधल्या दिवशी रात्री साडेबाराच्या सुमारास त्या दोघांमध्ये कोणत्यातरी कारणातून वाद झाले होते. त्यावेळी जेबा हिने नयन याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र काही वेळानंतर हा वाद मिटला देखील होता. दुसर्‍या दिवशी सकाळी 23 जुलैला नयन घरातून निघून गेला. रात्री उशीरापर्यंत तो घरी परत न आल्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला खूप शोधले व पोलीस स्टेशन मध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली. 25 जुलै रोजी वैदवाडी कॅनॉल हडपसर येथे त्याचा मृतदेह मिळून आला. त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच, त्याच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत, जेबा हिच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी नयन याला जीवे मारण्याची धमकी देऊन, त्याचा मानसिक छळ करून, त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा :Killing young man Pune : पुण्यातील नाना पेठ येथे मध्यरात्री तरुणाची हत्या; आरोपी फरार

ABOUT THE AUTHOR

...view details