पुणे -सोसायटीत शिरलेल्या चोरट्यांना विरोध केल्याच्या रागातून चौघांनी तरुणाला मारहाण करत पोटात दोनवेळा चाकू मारून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना नऱ्हेतील एका इमारतीत घडली आहे. प्रमोद किसन घारे (वय 35 वर्षे), असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रमोद खरे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद घारे नऱ्हेतील संकल्प सोसायटीत राहण्यास आहेत. सोमवारी (22 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास पार्किंगमधून आवाज येत असल्याने त्यांनी गॅलरीतून खाली पाहिले. त्यावेळी त्यांना एकजण गाडीचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. त्यामुळे घरातून खाली येत प्रमोद यांनी त्याला विरोध केला. काही अंतरावर उभे असलेल्या इतर चोरट्यांनी प्रमोद यांना मारहाण केली. एका चोरट्याने चाकू काढून प्रमोद यांच्या पोटात खुपसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर प्रमोद यांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरटे कंपाऊंडवरून उडी मारुन पळून गेले. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस तपास करत आहेत.
चोरट्यांना विरोध केल्यामुळे तरुणावर वार, नऱ्हेतील घटनेने खळबळ
सोसयटीत शिरलेल्या चोरट्यांना विरोध केल्याच्या रागातून चौघांनी तरुणाला मारहाण करत पोटत दोनवेळा चाकू मारून गंभीर जखमी केले आहे. ही घटना नऱ्हेतील एका इमारतीत घडली आहे.
मारहाण