महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून, इंदापूर तालुक्यातील घटना - बारामती गुन्हे बातमी

अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका 23 वर्षीय युवकाचा त्याच्या चार मित्रांनी धारदार शस्त्राने दोन्ही हात पाय व मुंडके तोडून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी येथे घडली.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 22, 2021, 7:04 AM IST

बारामती- अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका 23 वर्षीय युवकाचा त्याच्या चार मित्रांनी धारदार शस्त्राने दोन्ही हात पाय व मुंडके तोडून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी येथे घडली. संजय महादेव गोरवे वय 23 (रा.टाकळी, टेंभुर्णी ता.माढा जि सोलापूर) असे मृत युवकाचे नाव आहे.

तिन आरोपी ताब्यात -

अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून

मृत तरुणाची आई मंजुषा महादेव गोरवे (वय 51) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. या प्रकरणी दादा कांबळे (रा.बावडा, ता.इंदापूर ) अखिलेश उर्फ लकी विजय भोसले, व्यंकटेश उर्फ विकी भोसले, महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे( तिघे रा. टाकळी ता.माढा) हे आरोपी आहेत. पैकी व्यंकटेश उर्फ विकी भोसले, महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे या दोघांना इंदापूर पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली असून, एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदर घटना 17 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान घडली.

अशी आहे घटना -

हाती आलेल्या माहितीनुसार, घरातील महिलांशी गैरवर्तन केल्याचा संशय मनात धरुन इंदापूर तालुक्यातील बावडा येथे नातेवाईकांच्या घरी जेवणाच्या कार्यक्रमाला जाण्याचा बहाणा करून गणेशवाडी गावच्या हद्दीत भीमा नदीच्या गारअकोले पुलानजीक नदीपात्रात मृत संजय याचा वरील आरोपींनी धारदार शस्त्राने दोन्ही हात पाय व मुंडके तोडून निर्घुण खून केला. आरोपींनी खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन्ही हात पाय व डोके अज्ञात ठिकाणी फेकून मृतदेह ( धड) येथील भीमा नदीच्या पात्रात फेकून दिले. असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details