महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डुम्या डोंगर परिसरात तरुणाची दगडाने ठेचून हत्या - राजगुरूनगर खून बातमी

राजगुरुनगरजवळी डुम्या डोंगराच्या पायथ्याशी एका 22 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यापूर्वी त्या तरुणाला दारू पाजण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 5, 2021, 4:47 PM IST

राजगुरूनगर (पुणे) -राजगुरुनगरजवळील डुम्या डोंगराच्या पायथ्याखाली 22 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवार (दि. 5 जाने.) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे राजगुरूनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. राहुल बाबाजी सावंत, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

घटनास्थळ

दारू पाजून हत्या

डुम्या डोंगर परिसरात सायंकाळ व पहाटेच्या सुमारास मोठ्या संख्येने नागरिक फिरायला जात असतात. याच डोंगरांच्या पायथ्याखाली जंगल परिसरात डोक्यावर व चेहऱ्यावर दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. जवळच्याच व्यक्तीने दारू पाजून ही हत्या केल्याचा अंदाज राजगुरुनगर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सोमवारी (दि. 4 जाने.) संध्याकाळच्या सुमारास राहुलने मद्यपान केले त्यानंतर डुम्या डोंगराजवळील जंगल परिसरात गेल्यावर राहुलच्या डोक्यात व तोंडावर दगड टाकून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. डुम्या डोंगर परिसरात तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ पसरली आहे.

हेही वाचा -पाटेठाणमधून अवैध दारूसाठा जप्त, एकाला घेतले ताब्यात

हेही वाचा -गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details