महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : चाकणमध्ये जुन्या वादातून एकास विहिरीत ढकलले, तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यू - deelip ghavte case

जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाला दारुच्या नशेत विहिरीत ढकलून दिल्याची घटना घडली असून यात त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

chakan news
मृतदेह शोधताना पोलीस व नागरिक

By

Published : May 8, 2020, 11:03 AM IST

पुणे- खेड तालुक्यातील चाकण सेलु येथे जुन्या वादातून एका 30 वर्षीय तरुणाला विहिरीत ढकलून दिल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यामध्ये तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला आहे. दिलीप गणपत घावटे तरुणाचे नाव आहे.

चाकण व सेलु परिसरातील मित्र सेलु गावाच्या माळारानावर विहिरीच्या बाजुला एकत्र दारु पित होते. त्यावेळी एकाने जुन्या भांडणाचा वाद सुरु केला. यावेळी एकाने रागाच्या भरात दिलीप घावटे यास विहिरीत ढकलून दिले. दिलीपला पोहायला येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला आहे. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेनंतर सर्व आरोपी पळून गेले आहेत. चाकण पोलीस ठाण्यात भा. दं.वि.च्या कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे. टाळेबंदी दरम्यान दारु विक्रीला सुरु झाल्यानंतर दारु पिऊन भांडणे होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details