पुणे -कोथरूड परिसरातील वेताळ टेकडीवर आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेला एक तरुण पाय घसरल्याने टेकडीवरून खाली कोसळला. नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिल्यानंतर जवानांनी तातडीने तरुणाला जाळीच्या सहायाने वर काढले आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तरुणावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तनिष्क विशाल लोढा (वय 16) असे तरुणाचे नाव आहे.
वेताळ टेकडीवर गेलेला तरुण टेकडीवरून खाली कोसळला - vetal hill accident pune
कोथरूड परिसरातील वेताळ टेकडीवर आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेला एक तरुण पाय घसरल्याने टेकडीवरून खाली कोसळला. नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिल्यानंतर जवानांनी तातडीने तरुणाला जाळीच्या सहायाने वर काढले आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

आज सकाळी नऊच्या सुमारास तनिष्क हा मित्रांसोबत वेताळ टेकडीवर फिरण्यासाठी गेला होता. यावेळी एका टेकडीच्या टोकावर उभ्या असलेल्या तनिष्कचा पाय घसरला आणि तो खोल खाणीत कोसळला. त्यानंतर त्या ठिकाणी जमा झालेल्या नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिली. दरम्यान टेकडी परिसरात ड्युटीवर असलेले फायरमन संजय भावेकर यांनी खोल खाणीत उतरून जखमी तनिष्कला बाजुला आणले. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यास वर काढले.
हेही वाचा -सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी केले सावित्रीबाई फुलेंना अभिवादन