पिंपरी-चिंचवड (पुणे) :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला निखिल हा चिंचवड परिसरात राहणारा असून आयटी कंपनीत कामाला आहे. (Latest news from Mumbai) मित्राच्या वाढदिवसाची पार्टी (birthday party in Lonavala) सेलिब्रेशन करण्यासाठी तो इतर सहकाऱ्यांसह लोणावळ्यात गेला होता. (Death of drunken youth) जुना खंडाळा येथील अशोक निर्वाण सोसायटीमधील पाम ग्रूव्ह बंगल्यावर या सर्वांची पार्टी रंगणार होती. (Youth drowned in swimming pool)
Youth Drowned In Swimming Pool Lonavala : लोणावळ्यात वाढदिवसाच्या पार्टीत तरुणाचा स्वीमिंग पुलात बुडून मृत्यू - लोणावळ्यात मित्राच्या वाढदिवसाची पार्टी
लोणावळ्यात मित्राच्या वाढदिवसाची पार्टी (birthday party in Lonavala) करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा स्वीमिंग पुलात बुडून मृत्यू (Youth drowned in swimming pool) झाला आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास पाम ग्रूव्ह बंग्लो येथे घडली आहे. निखिल संपत निकम (वय २२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो दारू प्यायला होता (Death of drunken youth) असे पोलिसांनी सांगितले आहे. (Mumbai Crime) हिंजवडीतील नामांकित आयटी कंपनीत तो कामाला होता. लोणावळा शहर पोलिस अधिक तपास करत आहेत. (Latest news from Mumbai)
![Youth Drowned In Swimming Pool Lonavala : लोणावळ्यात वाढदिवसाच्या पार्टीत तरुणाचा स्वीमिंग पुलात बुडून मृत्यू Youth Drowned In Swimming Pool Lonavala](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17397354-thumbnail-3x2-youthdeath---copy.jpg)
तरुणाचा स्वीमिंग पुलात बुडून मृत्यू
तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू :रात्री उशिरा सर्वांची दारूची पार्टी रंगली. मात्र, निखिल हा एकटाच दारूच्या नशेत आज पहाटे स्वीमिंग पुलापाशी आला तो थेट दारूच्या नशेत पाण्यात पडला. यात त्याचा बुडून मृत्यू झाला. मित्रांनी पाहिल्यानंतर तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले अशी माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे.