महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये भाचीच्या प्रेमात पडणाऱ्या तरुणाला मामाने दिला चोप - पिंपरी-चिंचवड गुन्हे बातमी

भाचीसोबत असणाऱ्या प्रेमसंबंधातातून तरुणीच्या मामा व मित्राने तरुणाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

wakad police station
वाकड पोलीस ठाणे

By

Published : Aug 27, 2020, 4:00 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरातील वाकडमध्ये भाचीसोबत असणाऱ्या प्रेमसबंधाच्या रागातून तरुणाला मामांनी चोप दिल्याची घटना उघडकीस आली असून वाकड पोलीस ठाण्यात प्रियकर तरुणाने प्रेयसीच्या मामा विरोधात तक्रार दिली आहे. ही घटना बुधवारी (दि. 26 ऑगस्ट) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. रात्री उशिरा वाकड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

याप्रकरणी ऋषिकेश अशोक चपाले (वय 21 वर्षे) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण बोबडे, अजित वाघमोडे (तरुणीचा मामा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्राररदार ऋषिकेश हा वाकड परिसरातील ताथवडे येथील स्नॅक्स सेंटरवर थांबला होता. तेव्हा, दुचाकीवरून आलेल्या प्रेयसीच्या मामा आणि त्याच्या मित्राने ऋषिकेशला भाचीला का त्रास देतो, असे विचारत दमदाटी करत शिवीगाळ केली. ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी ऋषीकेशला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. अखेर परत जात असताना प्रेयसीच्या मामाचा मित्र प्रवीण बोबडे यांने कमरेचा बेल्ट काढून तू माझ्या भाचीच्या नादाला लागलास तर तुला बघून घेईल, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details