खेड (पुणे) -राजगुरुनगर शहरात रोज गोळा होणाऱ्या कचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावली जात नाही. तसेच कचरा डेपोतील कचरा वर्षभर काढला जात नाही यावरून राजगुरूनगर शहरातील नागरिकांनी शुक्रवारी (दि. 11 जून) नगरपरिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कचऱ्याच्या गाड्या खाली केल्या.
अचानक झालेल्या या प्रकाराने नगरपरिषद कार्यालय परिसरात काही काळ गोंधळ उडाला. येत्या चार दिवसांत शहरात जमा होणाऱ्या रोजच्या कचऱ्याची शहराबाहेर असलेल्या जागेत टाकण्याची व्यवस्था व्हावी. तसेच डेपोतील साठलेल्या कचऱ्याच्या संदर्भात महिन्याभरात कारवाई करावी अन्यथा यापेक्षा जोरदार आंदोलन केले जाईल, असा इशारा उपस्थित आंदोलकांनी दिला