महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून ऐन दिवाळीत तरुणाची आत्महत्या - kasaba baramati suicide

सावकाराच्या जाचाला कंटाळून ऐन दिवाळीत तरुणाने आत्महत्या केली. जहिर समद बागवान (वय 35) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बारामती शहरातील कसबा येथे हा तरुण राहत होता.

बारामतीमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून ऐन दिवाळीत तरुणाची आत्महत्या

By

Published : Oct 26, 2019, 5:13 PM IST

पुणे - सावकाराच्या जाचाला कंटाळून ऐन दिवाळीत तरुणाने आत्महत्या केली. जहिर समद बागवान (वय 35) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बारामती शहरातील कसबा येथे हा तरुण राहत होता.

हेही वाचा - निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोहफुलची २६९ लिटर दारू जप्त

जहीर बागवान या तरुणाने एका बचत गटातून व्याजाने पैसे काढले होते. त्यामुळे व्याजाच्या पैशावरून येथील सावकारांकडून वेळोवेळी त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून राहत्या घरात छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला. तक्रारदार पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. यात आकाश, जगताप आबा, रूपा खंडाळे उर्फ पोटे, विकास यांच्या नावे तक्रार दाखल झाली आहे. यातील बापू वाघमारे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत

ABOUT THE AUTHOR

...view details