पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात एक तरुण पत्र्याच्या छतावर चढला असताना काही फुटांवर विद्युत प्रवाह असलेल्या 'हायटेन्शन' तारेने त्याला खेचून घेतले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली असून जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप तरुणाचे नाव समजू शकलेले नाही.
पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली मोरे वस्ती येथे दुपारी दीडच्या सुमारास हायटेन्शन तारेला तरुण चिटकून गंभीर भाजल्याची घटना घडली. संबंधित तरुण हा हॉटेल सूर्या या ठिकाणी काम करण्यास असून त्याच हॉटेलच्या पत्राच्या छतावर भंगार जमा करण्यासाठी वरती गेला होता. तेव्हा लोखंडी पाईप उचलून घेत असताना तरुणाला विद्युत प्रवाह असलेल्या हायटेन्शन तारेने खेचून घेतले. नशीब बलवत्तर असल्याने काही क्षणात फेकून दिल्याने त्याचा जीव वाचला. दरम्यान, काही मिनिटे तो निपचित पडला होता मात्र त्यानंतर स्वतः चालत तो खाली उतरला. सुदैवाने यात तो बचावला असला तरी गंभीर भाजला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विद्युत प्रवाह असलेल्या हायटेन्शन तारेला तरुण चिकटला; सुदैवाने बचावला - पिंपरी-चिंचवड पुणे बातम्या
छतावर लोखंडी पाईप उचलून घेत असताना तरुणाला विद्युत प्रवाह असलेल्या हायटेन्शन तारेने खेचून घेतले. नशीब बलवत्तर म्हणूनच काही क्षणात फेकून दिल्याने त्याचा जीव वाचला. दरम्यान, काही मिनिटे तो निपचित पडला होता मात्र त्यानंतर स्वतः चालत तो खाली उतरला.
Breaking News