पुणे- नगर-पुणे महामार्गावर कोरेगाव-भिमा येथील कल्याणी चौकात सकाळच्या सुमारास कामावर निघालेल्या तरुणीला अज्ञात ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला आहे. प्रतिक्षा चव्हाण असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
कोरेगाव-भिमा येथे कामावर निघालेल्या तरुणीला ट्रकने चिरडले - अपघात
अपघातात मृत झालेली तरुणी भल्या सकाळी पुणे नगर महामार्गावरील पदचारी मार्गावरुन चालली असताना पाठीमागुन भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात ट्रकने तिला धडक दिली. या धडकेत तिचा जागीच मृत्यु झाला.
अपघातात मृत झालेली तरुणी पहाटे पुणे-नगर महामार्गावरील पदचारी मार्गावरून चालली असताना पाठीमागुन भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात ट्रकने तिला धडक दिली. या धडकेत प्रतिक्षाचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे.
मागील अनेक दिवसांपासून पुणे-नगर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी व अपघातांची मालिका सुरुच आहे. मात्र, अपघात व वाहतूक कोंडींवर उपाययोजना करण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे, अशा दुर्दैवी घटना होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.