महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पायी परतीच्या प्रवासात 17 वर्षीय मुलगी अपघातात गंभीर जखमी - शिरुर अपघात न्युज

शिरूर तालुक्यातील कारेगाव औद्योगिक वसाहतीत यवतमाळ जिल्ह्यातील बळीराम जाधव यांचे कुटुंब केली सहा वर्षांपासून राहत आहेत. या औद्योगिक वसाहतीत त्यांच्यासारखे इतर अनेक मजूर कामासाठी वास्तव्याला होते. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे या कुटुंबावर अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगण्याची वेळ आली. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी गावी जायचे ठरवले.

young girl seriously injured in accident
तरुणी अपघातात गंभीर जखमी

By

Published : May 14, 2020, 10:18 AM IST

Updated : May 14, 2020, 11:41 AM IST

शिरुर (पुणे) :शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील मजूर कुटुंब यवतमाळ जिल्ह्यात पायी जात होते. त्यावेळी दोन दुचाकीस्वारांनी त्यांना लिफ्ट दिली. त्यानंतर दुचाकीवरुन उतरताना मुलीने गाडी थांबण्या अगोदर गाडीवरुन उडी मारल्याने ती खाली पडली. या अपघातात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. राजेंद्र ढोले यांनी सांगितले आहे. जयश्री जाधव (17) असे जखमी मुलीचे नाव आहे.

शिरुर तालुक्यात यवतमाळ येथील तरुणीचा अपघात.. तरुणी गंभीर जखमी...

हेही वाचा...धक्कादायक : आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या बैठकीत उपस्थित असलेले दोन अधिकारीच कोरोनाबाधित

शिरूर तालुक्यातील कारेगाव औद्योगिक वसाहतीत यवतमाळ जिल्ह्यातील बळीराम जाधव यांचे कुटुंब केली सहा वर्षांपासून राहत आहेत. या औद्योगिक वसाहतीत त्यांच्यासारखे इतर अनेक मजूर कामासाठी वास्तव्याला होते. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे या कुटुंबावर अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगण्याची वेळ आली. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी गावी जायचे ठरवले.

मुलाबाळांसह खिशात फक्त 100 रूपये घेवून ते प्रवास करत होते. पुणे-नगर महामार्गावरुन पायी प्रवास करत असताना दोन दुचाकीस्वारांनी त्यांना मदत म्हणुन लिफ्ट दिली. त्यानंतर एका दुचाकीवर बसलेल्या कुटुंबातील 17 वर्षीय मुलीने गाडी थांबण्याअगोदरच उडी मारली. या अपघात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला शिरुर येथील श्री गणेशा हॉस्पिटल येथे नेण्यात आले. येथील रुग्णालय कर्मचाऱ्यांनी देवदुत बनु सदर मुलीवर तातडीने आणि मोफत उपचार केले आहेत.

Last Updated : May 14, 2020, 11:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details