खराडीत कामावरून घरी परत जाणाऱ्या तरुणीचे अपहरण करून बलात्कार - पुणे विश्रांतवाडी तरुणीचे अपहरण करुन बलात्कार
गुरुवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान हा प्रकार घडला. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धानोरी परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पुणे - विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कामावरून घरी परत निघालेल्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान हा प्रकार घडला. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धानोरी परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
नेमके काय घडले?
याप्रकरणी अधिक माहिती अशी, की पीडित तरुणी ही खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये काम करते. गुरुवारी रात्री काम संपल्यानंतर घरी परत जात असताना एका व्यक्तीने तिचा पाठलाग सुरू केला. तिला मारहाण करत त्याच्या दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला खराडीतील निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जात तिच्यावर पाशवी बलात्कार केला. या सर्व कृत्यानंतर आरोपीने पीडित मुलीला पुन्हा येरवड्यातील गुंजन चौकात आणून सोडले. पीडित मुलीने त्यानंतर रात्री उशिरा आपल्या मित्राला फोन करून झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गाठत अत्याचार झाल्या संबंधीची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -रिया चक्रवर्ती 'चेहरे' चित्रपटातून अमिताभसोबत कमबॅक करणार?