महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Young Girl Raped : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार ; इंस्टाग्रामवरील प्रेम प्रकरण पडले महागात - पुण्याच्या तरूणीवर अत्याचार

सोशल माध्यमांचा गैरवापर अनेकदा होताना समोर येत (acquaintance on Instagram) आहे. इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीची पुण्याच्या एका तरुणीला मोठी किंमत मोजावी लागली (Young Girl Raped) आहे.

young girl from Pune raped in Gujarat
पुण्याच्या तरुणीवर गुजरातमध्ये अत्याचार

By

Published : Oct 22, 2022, 11:32 AM IST

पुणे : सोशल माध्यमांचा गैरवापर अनेकदा होताना समोर येत (acquaintance on Instagram) आहे. इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीची पुण्याच्या एका तरुणीला मोठी किंमत मोजावी लागली (Young Girl Raped) आहे. या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचाराला सामोरे जावे लागलेले आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा, इंस्टाग्रामची ओळख आपल्याला सुद्धा महागात पडू शकते.


लग्नाचे आमिष :इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत गुजरातला नेऊन तिच्यावर अत्याचार केले. अखेरत रुणीने तिथून स्वतःची सुटका करून घेतली. तीने पुण्याला येऊन झाकीर इस्माईल झवेरीवाला (वय 35, रा. गुजरात) नामक तरुणावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 23 वर्षीय फिर्यादी तरुणी मूळची नेपाळची असून ती सध्या पुण्यात ढोले पाटील रोडवर वास्तव्यास (young girl from Pune raped in Gujarat) आहे.

वेळोवेळी लैंगिक अत्याचार :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाकीर आणि पीडिता यांची इंस्टाग्रामवर नोव्हेंबर 2021 मध्ये ओळख झाली. ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये बोलणे वाढू लागले. ओळखीच रूपांतर प्रेमात झाले. आणि त्यानंतर त्यांची प्रत्यक्षात भेट झाली. भेटीनंतर झाकीरणे पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत गुजरातमधील बडोद्याला नेले. तेथे त्यानी पीडितेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. पीडित तरुणीने झाकीरला लग्नाबद्दल विचारले असता तो उडवा उडवीचे उत्तरे देत (raped in Gujarat From acquaintance on Instagram) असे.

जीवे मारण्याची धमकी :पीडित तरुणीला झाकीरच अगोदरच लग्न झालेले कळाले. त्यानंतर झाकीरने पीडित तरुणीला गुजरातमधील एका घरात डांबून ठेवत तिला अ‍ॅसीड टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र एक दिवस झाकीर आपल्या पहिल्या पत्नीला भेटायला गेल्याने पीडितने तिथून मोठ्या शिताफीने आपली सुटका केली, आणि थेट पुणे गाठले. मात्र झाकीरने वेगवेगळ्या फोननंबर वरून तिला फोन करून 'तू कुठेही गेलीस, तरी तुला सोडणार नाही' अशी धमकी दिली. झाकीरच्या सारख्या धमक्यांना घाबरून अखेर पीडितेने येरवडा पोलीस ठाण्यात झाकीर विरोधात फिर्याद दाखल केली. पीडीतीचा फिर्यादीनुसार झाकीरवर वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. येरवडा पोलीस पुढील तपास करत असून आरोपीस अद्याप अटक झालेली (young girl from Pune) नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details