पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये दातांवर शस्त्रक्रिया करताना झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाने निष्काळजीपणा केल्याची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
दातांवरील शस्त्रक्रियेदरम्यान तरुणीचा मृत्यू, रुग्णालयाने निष्काळजीपणा केल्याचा कुटुंबीयांचा आरोप - dental operation
पिंपरी-चिंचवडमध्ये दातांवर शस्त्रक्रिया करताना झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, धनश्री जाधव (वय २३, रा. मारुंजी) असे मृत तरुणीचे नाव आहे. धनश्री निगडीतील एका आयर्वेदिक रुग्णालयात उपचार घेत होती. गेल्या आठवड्यात २४ एप्रिल रोजी तिच्या दातांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ४ मे ला सकाळी तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी निगडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्याप्रमाणेच शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.