पुणे- महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने हवेत गोळीबार करुन तरुणीला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळील जांबुत फाटा येथे हा प्रकार घडला आहे. अक्षय दंडवते असे गोळीबार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
एकतर्फी प्रेमात तरुणाचा हवेत गोळीबार.. हेही वाचा... व्हायरल व्हिडिओ प्रकरण; अपायकारक भाज्या विकणाऱ्या 'त्या' विक्रेत्यावर गुन्हा दाखल
पीडित तरुणी पोलीस भरती प्रशिक्षण घेत असून अक्षय दंडवतेचे तिच्यावर प्रेम आहे. मात्र, तरुणीचा प्रेमास नकार आहे. दरम्यान, नारायणगाव जवळील जांबुत फाटा येथे दुचाकीवर असलेल्या तरुणीला अक्षयने थांबवले. तरुणीशी दमदाटी करत तिला धमकावण्यासाठी हवेत गोळीबार केला. या प्रकारामुळे तरुणी भयभीत झाली आहे.
याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तपासचक्र फिरवून पोलिसांनी अक्षयला चार तासात शोधून अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.