हडपसर (पुणे) - येथील पोलीस स्टेशनजवळ शुक्रवारी मध्यरात्री एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. खुन्नस देऊन पाहिल्याने झालेल्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून तरुणाचा निर्घृपणे खून केला. अनिकेत घायतडक असे मृत तरुणाचे नाव आहे. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खुन्नस दिल्याच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून, हडपसरमधील घटना - हडपसर तरुण खुन बातमी
पुण्याच्या हडपसरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. खुन्नस देऊन पाहिल्याने हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अनिकेत घायतडक असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्रकरण काय आहे?
प्राथमिक माहितीनुसार, मृत अनिकेत घायतडक आणि आरोपींमध्ये एकमेकांकडे खुन्नस देऊन पाहिल्यामुळे वाद झाला. या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने अनिकेत घायतडक याला मांजरीतील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात गाठले. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून निर्घृणपणे त्याचा खून करुन पसार झाले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून या प्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. मयत अनिकेत घायतडक याच्यावर मुंढवा पोलीस स्टेशन मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. याबाबत हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.