दौंड (पुणे)- भाईगिरी करणाऱ्या आणि सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुंडांची गय केली जाणार नाही. अशा गावगुंड आणि भाईंवर तडीपारी आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा यवत पोलिसांनी ( yawat police warning to action ) दिला आहे.
गुन्हेगारांवर कठोर पावले उचलणार -
गावात काही टवाळखोर आणि गावगुंड यांमुळे गावातील वातावरण बिघडते. शाळा महाविद्यालयाच्या आवारात फिरणारे रोड रोमिओ, महिलांची छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये सामाजिक सलोखा रहावा. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कायद्याचा धाक रहावा. यासाठी कडक कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे. गावगुंडांमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. अशा समाजकंटकांनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो या सर्व प्रकाराला आळा बसावा. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावातील नागरिकांना गाव गुंडापासून मोकळा श्वास मिळावा यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.