महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवत पोलिसांची अवैध वाळू उपशावर कारवाई; बारा लाखांच्या बोटी उधवस्त - Yavat police action on sand mafia

वाळु उपशामुळे पर्यावरणाची हानी तसेच नदीपात्राचे नुकसान होते. यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन यांत्रिक फायबर बोटीवर कारवाई करण्यात आली.

वाळू उपशावर कारवाई
वाळू उपशावर कारवाई

By

Published : Feb 20, 2021, 10:29 PM IST

दौंड (पुणे)-यवत पोलिसांनी वाळू माफियांना पुन्हा दणका दिला आहे. पोलिसांनी 12 लाख रुपये किमतीच्या 2 वाळू काढण्याच्या यांत्रिक फायबर बोटी उद्धवस्त केल्या आहेत. दौंड व हवेली तालुक्याच्या सिमेवर मिरवडी गावच्या हद्दीत मुळा-मुठा नदीत सुरू असलेल्या वाळु उपशावर यवत पोलीस व महसुल प्रशासनाने कारवाई केली आहे.

दौंड व हवेली तालुक्याच्या सीमेवरील दौंड तालुक्यातील मौजे मिरवडी गावच्या हद्दीतील मुळा-मुठा नदी पात्रात अवैधरित्या बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता. वाळु उपशामुळे पर्यावरणाची हानी तसेच नदीपात्राचे नुकसान होते. यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन यांत्रिक फायबर बोटीवर कारवाई करण्यात आली. वाळु उपसा करणाऱ्या दोन बोटी उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. यवत पोलीस आणि महसुल विभागाने वाळू उपसा करणाऱ्यावर पुन्हा एकदा कारवाई करून दणका दिला आहे. त्यामुळे वाळु माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

कारवाई करणारे पथक-
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल हेमंत कुंजीर, सुजित जगताप, सोमनाथ सुपेकर, नारायण जाधव व महसूल कर्मचारी दहिटणेचे तलाठी पुंडलिक केंद्रे,अभिमन्यू जाधव या पथकाने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details