पुणे- डॉ. श्रीराम लागू गेल्याने नाट्यसृष्टीतील आज एक धगधगते पर्व शांत झाले आहे, अशी प्रतिक्रिया लेखक किरण यज्ञोपवीत यांनी दिली. मंगळवारी (दि. 17 डिसें) ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. याबाबत यज्ञोपवीत दुःख व्यक्त करत होते.
नाट्यसृष्टीतील धगधगतं पर्व शांत झालं - किरण यज्ञोपवीत - लेखक किरण यज्ञोपवीत
डॉ. श्रीराम लागू गेल्याने नाट्यसृष्टीतील आज एक धगधगते पर्व शांत झाले आहे, अशी प्रतिक्रीया लेखक किरण यज्ञोपवीत यांनी दिली.
ते म्हणाले, लागू हे महाराष्ट्रातील फक्त नाटकच नाही तर विवेकाचा बुलंद आवाज होते. ते महाराष्ट्रातील सर्व स्तरातील माणसासाठी एक अतिशय प्रखर वैचारिक भूमिका घेतलेला नट होते. मराठी रंगभूमीच्या संक्रमणावस्थेत असताना स्वतःची वेगळी शैली निर्माण करत विचारांची परिपक्वता आणि सामाजिक भान असलेले नाटक त्यांनी उभे केले होते. ते सेवादलाच्या मागे उभे राहिले. अनेक वर्षाची त्यांची ही लढाई असल्याचेही यज्ञोपवीत यांनी म्हटले.
हेही वाचा - आद्य नटसम्राट हरपला, ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे निधन