पुणे : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात गेल्या १५ दिवसांपासून उपचार सुरू होते. एक वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर या आजाराचे निदान झाले होते. १५ दिवसांपूर्वी त्यांची तब्बेत खालावल्याने त्यांना पुण्यातील खासगी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ( Dinanath Mangeshkar Hospital ) दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती शिल्पा कोत्तापल्ले (सून) यांनी दिली होती. आज दुपारी त्यांचे निधन झाले आहे.
मराठी विषयात पहिले -नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च, इ.स. १९४८ या दिवशी जिल्हा नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला.शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यात ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले. त्यांनी १९८० मध्ये मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथुन डॉ.यु.म.पठाण सरांच्या मार्गदर्शनाने 'शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास' या विषयावर पीएच. डी.चे संशोधन करुन त्यांनी पदवी मिळवली होती.
कारकीर्द -नागनाथ कोतापल्ले हे इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००५ पासून २०१०पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे. याउपर, नागनाथ कोतापल्ले हे १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते. तसेच 'प्रतिष्ठान' या नियतकालिकाचे संपादक म्हणुनही त्यांनी काम केले आहे.
कुलगुरूपदी निवड - ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले हे इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००५ पासून २०१०पर्यंत कोतापल्ले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे. याउपर, नागनाथ कोतापल्ले हे १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते. तसेच 'प्रतिष्ठान' या नियतकालिकाचे संपादक म्हणुनही त्यांनी काम केले आहे.