पुणे- शुक्रवारी सर्वत्र जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मभूमीत देशाच्या सीमेवर असणाऱ्या जवानांच्या वीर पत्नींचा विशेष सन्मान हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्यावतीने करण्यात आला.
महिला दिन : वीरपत्नींचा हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्यावतीने सन्मान
देशाच्या सीमेवर असणाऱ्या जवानांच्या वीर पत्नींचा विशेष सन्मान हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्यावतीने करण्यात आला.
स्त्री जन्माचे स्वागत आजच्या दिवशी जगभर होते. मात्र, तिच्या कर्तृत्वाचा सन्मान हा कधीतरी होतो, हाच दृष्टिकोन ठेवून खेड, आंबेगाव, जुन्नर या परिसरातील जवानांच्या वीरपत्नींचा व त्यांच्या शौर्याचा एक अनोखा वेगळा सन्मान सोहळा क्रांतिकारकाच्या जन्मभूमीत करण्यात आला. यावेळी झालेला सन्मान पाहून वीरपत्नी भावूक झाल्या.
यावेळी या उत्सवात वीरपत्नींना सोशल फाउंडेशनच्या महिलांनी विविध पदार्थांची मेजवानी दिली. यावेळी सर्व महिलांनी तिखट, गोडधोड जेवणाचा आस्वाद घेतला.