महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

IND Vs BAN Tickets : भारत-बांगलादेश सामन्याचं १२०० रुपयांच्या तिकिटाची १२ हजार रुपयांना विक्री, दोघांना अटक

World Cup 2023 IND vs BAN : आज भारत विरुद्ध बांगलादेश असा क्रिकेटचा सामना रंगणार आहे. याच दरम्यान सामन्याचे तिकीटं जास्त दरात विकणाऱ्या दोघांना पिंपरीच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे.

World Cup 2023 IND vs BAN
भारत-बांगलादेश सामन्याचे तिकीटं जास्त दरात विकणाऱ्या दोघांना अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 2:05 PM IST

पिंपरी चिंचवडWorld Cup 2023 IND vs BAN: यंदाच्या विश्वचषकातील 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आजचा सामना होणार असून या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे तिकीट जास्त दराने विक्री करणाऱ्या दलालांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. तसंच या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीये.

काय आहे प्रकरण : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत विरुद्ध बांगलादेश हा पहिला सामना आज (19 ऑक्टोबर) दुपारी दोन वाजता सुरू होण्यापूर्वी तिकिटाची विक्री चढ्या दरानं करण्यात येत होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या तिकीटाचे दर 1200/- रुपये आहे. मात्र,याचे दर 12,000/- रुपये सांगून दलालांकडून त्याची विक्री केली जात आहेय. या संदर्भात माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सापळा रचत दोन जणांना अटक केली.

फसवणुकीचा गुन्हा दाखल : रवी देवकर आणि अजित कदम यांनी ही तिकीटं पुरवली असल्याची माहिती तपासात समोर आली. त्यामुळं या दोघांविरोधात रावेत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना कोर्टात हजर केलं असता त्यांना 30 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी क्रिकेट सामन्याच्या तिकीटांचा काळा बाजार होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे.


कोणी केली कारवाई : दरम्यान, ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. World Cup 2023 IND vs BAN : सलग चौथ्या विजयासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया; मात्र सामन्यात येऊ शकतो पावसाचा व्यत्यय?
  2. Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडनं अफगाणिस्तानला लोळवलं, १४९ धावांनी मोठा विजय
  3. Cricket World Cup 2023 : 'भावानं सर्वोत्तम कामगिरी करून विश्वचषक जिंकवून द्यावा'; रविंद्र जडेजाच्या बहिणीची 'ETV भारत'शी खास बातचीत

ABOUT THE AUTHOR

...view details