पुणे Horticulture Exhibition In Pune: महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन, असोसिएशन ऑफ एनवायरमेंटल हॉर्टिकल्चर आणि वसू इव्हेंट तसेच हॉस्पिटॅलिटी यांच्यावतीनं भारतातील सर्वात मोठे 'आंतरराष्ट्रीय हॉर्टीप्रोइंडिया' (World Class Horticultural Exhibition) फुलोत्पादन बागायती प्रदर्शनाला आज सुरूवात झाली आहे. याचं उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पार पडलं. यात भारतातील जवळपास 300 तर परदेशी 60 हून अधिक नर्सरी करणारे व्यावसायिक यात सहभागी झाले आहेत. जगातील तसेच देशातील विविध फुले आणि त्यांची केलेली उत्कृष्ठ सजावट नर्सरीमध्ये पाहायला मिळाली.
कृषी क्षेत्रात व्यवसायाची संधी : आमदार अशोक पवार म्हणाले की, मार्को कोंटी, मारियानो टार्टाग्लिया जर्मनी, पिम वेंडर नॅप, बर्ट व्हॅन स्पिजक नेदरलँड्, बांगलादेश, इंडोनेशिया, नेपाल अशा परदेशातून अनेकांनी 'हॉर्टीप्रोइंडिया' प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्यानं, भारतासाठी येणाऱ्या कृषी क्षेत्रात मोठी व्यवसायाची संधी निर्माण होणार आहे. अश्या या हॉर्टिकल्चर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तसेच गार्डनिंग क्षेत्रातल्या नवनवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. हॉर्टिकल्चर क्षेत्रातील देशातील आणि परदेशातील शेतकरी, व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. यावेळी कोंजेटी, श्रद्धा रासने, महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन अध्यक्ष शशिकांत चौधरी, सेक्रेटरी आनंद कांचन वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटीचे वसंत रासने, विजय रासने, आदी मान्यवर उपस्थित होते.